दीपिकाला घेऊन नाना बनविणार चित्रपट
दीपिका पदुकोण सध्या बॉलीवूडमधील महत्त्वाची नायिका बनली आहे. अनेकांना तिच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. आता तिच्या या चाहत्यांमध्ये नाना पाटेकरांचे नाव सामील झाले आहे. नानाला दीपिकासोबत चित्रपट करायचा आहे. नानाने हा चित्रपट केल्यास त्याने दिग्दर्शित केलेला तो दूसरा चित्रपट ठरेल.
यापूर्वी नानाने माधुरी दीक्षित व डिम्पल कपाडिया यांना घेऊन प्रहार चित्रपट केला होता. यात नाना मुख्य भूमिकेत होता. प्रहारचे समीक्षकांनी कौतुक केले होते. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट हिट झाला होता.
प्रहारनंतर नानाला आणखी एक चित्रप करायचा होता. पण जमले नाही. प्रकाश झा यांच्यासाठीही तो चित्रपट दिग्दर्शित करणार होता. पण राजनीती या चित्रपटादरम्यान त्यांचे संबंध दुरावले.
नाना आता आपल्या दुसर्या चित्रपटाच्या कामाला सुरवात करणार आहे. स्क्रिप्ट फायनल करून शुटींग सुरू केले जाईल. दीपिका नानाच्या चित्रपटाला नकार देणार नाही अशी अपेक्षा आहे.
No Response to "दीपिकाला घेऊन नाना बनविणार चित्रपट"
Post a Comment