जेव्‍हा राज ठाकरे सीएसटीला व्‍हीटी संबोधतात

Posted on Friday, March 19, 2010 by maaybhumi desk

मुंबई


मराठी माणूस आणि मुंबईच्‍या नावाने 'राज'कारण करणारे मनसे नेते राज ठाकरे पुनहा एकदा वादाच्‍या भोव-यात सापडले आहेत. यावेळी मराठीच्‍या अट्टहासामुळे किंवा उत्तर भारतीयांवर तथाकथित विखारी वक्तव्‍यामुळे वाद निर्माण झालेला नसून मराठीचा अट्टहास करणा-या राज यांनी सीएसटीला व्‍हीटी असे संबोधल्‍यामुळे झाला आहे. राज यांच्‍या या दुतोंडी धोरणामुळे राष्‍ट्रवादीसह कॉंग्रेसच्‍या नेत्यांनी त्यांच्‍यावर तोंडसुख घ्‍यायला सुरूवात केली आहे. तर मराठी माणूसही आश्‍चर्यचकीत झाला आहे.


'वेक अप सीड' या चित्रपटात मुंबईला बॉम्बे म्हणून संबोधल्‍याप्रकरणी राज्यभर धुमाळा घालणा-या आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांना माफी मागायला भाग पाडणा-या राज ठाकरे यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) वरील एका जाहीर कार्यक्रमात केलेल्‍या भाषणात सीएसटीचा उल्‍लेख व्‍हीटी (व्‍हीक्टोरीया टर्मिनस) असा केला. विशेष म्हणजे सुमारे 10 वर्षांपूर्वी व्‍हीटीचे नाव बदलून त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्‍यात यावे यासाठी चालविलेल्‍या आंदोलनात राज ठाकरे आघाडीवर होते. त्यावेळी ते शिवसेनेत होते. 


मात्र खुद्द राज यांनीच व्‍हीटी असा उल्‍लेख केल्‍याने सर्वत्र आश्‍चर्य व्‍यक्त होत आहे. तर राज यांच्‍या या दुतोंडी धोरणाबाबत कॉंग्रेस व राष्‍ट्रवादीने त्यांच्‍यावर जोरदार तोंडसुख घ्‍यायला सुरूवात केली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "जेव्‍हा राज ठाकरे सीएसटीला व्‍हीटी संबोधतात"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner