अवघ्‍या 20 डॉलरमध्‍ये चार मिग विमाने!

Posted on Sunday, March 28, 2010 by maaybhumi desk


मास्को

सुमारे 37 लाख डॉलर किंमतीचे मिग विमान जर अवघ्‍या पाच डॉलरला मिळालं तर. हो फक्त पाच डॉलर, नाही हे खेळण्‍यातलं नव्‍हे खरंखुरं विमान आहे आणि ते विकलं आहे एका रशियन अधिका-याने या अधिका-यावर आरोप करण्‍यात आला आहे, की त्‍याने 2007 मध्‍ये 4 मिग-31 फॉक्सहाउंड विमानं अवघ्‍या पाच-पाच डॉलरमध्‍ये विकली होती. या संदर्भात स्टेट रिजर्व एजन्‍सीच्या एका माजी कर्मचा-यावर तपास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्‍टाचार केल्‍याचा आरोप लावण्‍यात आला आहे.


सोकोल एअरक्राफ्ट कंस्ट्रक्शन प्लांटमधून विकल्‍या गेलेल्‍या वस्‍तूंच्‍या चौकशी दरम्यान ही माहिती समोर आली आहे.  हा प्रकल्‍प रशियाच्‍या निझनी नोवोगोरोड शहरात आहे.

या कर्मचा-याने आपला गुन्‍हा कबुल केलेला नाही. मात्र जर त्‍याच्‍यावरील आरोप सिध्‍द झाले तर आरोपीस किमान पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner