प्रजासत्ताकदिनी दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली


अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्‍या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले असून राजधानी दिल्लीतही विजय चौक ते लाल किल्ल्यापर्यंतचा भाग लष्‍करी छावणीत रुपांतरीत झाले आहेत. या दिवशी दहशतवादी हल्‍ला होऊ शकतो असा इशारा गुप्‍तचर यंत्रणांनी दिल्‍यानंतर परिसरात १८ हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जमिनीवरून हवेत मारा करू शकणारी अस्त्रही यावेळी सज्ज ठेवण्यात येणार आहेत. लष्कर ए तय्यब्बा पॅराग्लायडिंगद्वारे हल्ला करण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात येणार आहे. विमानभेदी गन्स, शीघ्र कृती दल, कमांडो तसंच नॅशनल सिक्युरिटी गार्डस यांनाही विविध ठिकाणी नेमण्यात येणार आहे.

अनेक राज्य आणि शहरंही हाय अलर्टवर आहेत. आसाममधील रात्रीच्या गाड्या २६ तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीसह अन्य शहरांमध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात आलीय. भारतीय तटरक्षक दल आणि नौसेनाही समुद्रमार्गे होऊ शकणा-या हल्ल्यांना तोंड द्यायला सज्ज आहे.

आग्र्यासारखी ऐतिहासिक महत्वाच्‍या शहरांनाही हाय अलर्टवर ठेवण्‍यात आले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "प्रजासत्ताकदिनी दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner