पाकमध्ये मुलींच्या शाळेवर तालिबानी हल्ला
Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतातील चारसद्दा जिल्ह्यात तालिबानी दहशतवाद्यांनी मुलींच्या एका खाजगी शाळेच्या इमारतीवर हल्ला करून ती उडवून दिली आहे. तालिबानी कायद्यात स्त्रियांना शिक्षणास विरोध आहे.दहशतवाद्यांनी इकरा पब्लिक स्कूलच्या इमारतीवर बॉम्ब हल्ला करून शाळेची इमारत उडवून देण्यात आली आहे. हा स्फोट शनिवारी रात्री केला गेला आहे. या स्फोटात कुणीही मारला गेलेला नाही.
स्फोटामुळे विद्यालयातील दोन खोल्या आणि भिंती पूर्णतः उध्वस्त झाल्या आहेत. यापूर्वी दहशतवादी सरकारी शाळांना लक्ष्य करीत होते. या हल्ल्यात पहिल्यांदाच खाजगी विद्यालय उडवण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "पाकमध्ये मुलींच्या शाळेवर तालिबानी हल्ला"
Post a Comment