शाहरूख विरोधात आता 'फतवा'
कोलकाता
बॉलीवुड स्टार शाहरुख खान समोरील आव्हाने कमी होण्याची चिन्हे दिसत नसून शिवसेनेच्या आंदोलनातूनकसाबसा सावरलेल्या 'खान'विरोधात आता 'फतवा' जारी करण्यात आला आहे. कोलकाताच्या टीपू सुलतानमशिदीचा शाही ईमाम सैयद नूर-उल-रहमान बरखती यांनी मुस्लिम समुदायास शाहरूखच्या चित्रपटांवर बहिष्कारघालण्याचे आवाहन केले आहे.
शाही ईमाम यांचे म्हणणे आहे, की शाहरुखने इस्लाम विरोधी कृत्य केले आहे. अशोक तोडी या वादग्रस्त व्यक्तीच्याकंपनी उत्पादनांची जाहीरात केली आहे. अशोक तोडी यांची कन्या प्रियंका हिच्याशी प्रेम विवाह केल्यानंतर एकामहिन्यातच ग्राफिक्स डिजाइनर रिजवानुर रहमान याचा रहस्यमय रित्या मृत्यू झाला आहे.
शाही ईमाम यांच्या म्हणण्यानुसार शाहरुख कडे अपार संपत्ती असताना त्याने एखाद्या वादग्रस्त व्यक्तीच्या कंपनीचाब्रांड एंबेस्डर बनणे चुकीचे आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चित्रपटांवर बहिष्कार करण्याचे आवाहन फतव्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
No Response to "शाहरूख विरोधात आता 'फतवा'"
Post a Comment