पवार, नीतीश कुमार यांचे फोन टॅप

Posted on Saturday, April 24, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

केंद्र सरकारने केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, कॉंग्रेस नेता दिग्गविजय सिंह, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात आणि आयपीएल आयुक्त ललित मोदी यांचे फोन टॅपिंग केल्याचे वृत्त आहे. 'आऊटलूक'ने याबाबत वृत्त दिले आहे.

शरद पवार यांचे फोन टॅपिंग आयपीएल वादानंतर झाले आहे. दिग्गविजय सिंह यांचे फोन टॅपिंग फेब्रुवारी 2007 मधील आहे. त्यावेळी कॉंग्रेस कार्यकारणीची निवडणूक होती. नीतीश कुमार यांचे फोन ऑक्टोंबर 2007 मध्ये टॅपिंग करण्यात आले आहे. नीतीशकुमार त्या कलावधीत दिल्लीत आपल्या पक्षाच्या नेत्यांशी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी कशा मिळवावा, याबाबत चर्चा करीत होते. प्रकाश करात यांचे फोन जून 2008 मध्ये टॅपिंग करण्यात आले होते. भारत-अमेरिका अणूकराराचा मुदा त्यावेळी चर्चेत होतो. मोबाईल, लॅण्डलाईन आणि इंटरनेट या तिन्ही प्रकारात टॅपिंग करण्यात आले होते.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner