सानियाचे लग्न हैदराबादलाच
Posted on Saturday, April 03, 2010 by maaybhumi desk
भारताची टेनिस स्टार सनिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचे लग्न दुबईला नव्हे हैदराबादमध्येच होणार असल्याचे सानियाच्या कुटुंबियांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाकिस्तानमधील वृत्तवाहिन्यांनी वादामुळे हे लग्न दुबईला होणार असल्याचे म्हटले होते.
पाकिस्तानमधील जिओ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार आयेशा सिद्धीकच्या वादामुळे हे लग्न दुबईला स्थलांतरीत करण्यात आल्याचे वृत्त दिले होते. तसेच लग्नची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले होते. आयेशा सिद्धीकी आणि शिवसेनेच्या लग्नाला विरोध असल्यामुळे दुबईत लग्न होणार असल्याचे जिओ टीव्हीने म्हटले होते. त्याबाबत सानियाच्या कुटुंबियांनी स्पष्टीकरण दिले आहे. हे लग्न हैदराबादला होणार असल्याचे सांगितले आहे.
शोएब मलिकही शुक्रवारी सानियाच्या घरी दाखल झाला होतो. त्यांच्या बॉल्कनीत अनेकांनी शोएब आणि सानियाला एकत्र पाहिले.
सानिया आणि शोएब यांच्या लग्नासाठी शोएबचे कुटुंबिय सहा एप्रिलला भारतात येणार आहेत. लग्नानंतर दुबईत राहणार आहेत.
