नित्यानंदाच्या आश्रमात लैंगिक लीलांचा कोर्स!

Posted on Saturday, April 24, 2010 by maaybhumi desk


बंगळुरू

वादग्रस्त धार्मिक गुरू स्वामी नित्यानंदाच्या विविध लीला आता उघडकीस येऊ लागल्या आहेत. त्याच्या बंगळुरूजवळील ध्यानपीठम आश्रमात प्राचीन तांत्रिक गूढ विद्या शिकण्याच्या नावाखाली शिष्यांमध्ये लैंगिक क्रिया चालत असल्याचे आता उघड झाले आहे.


राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) या आश्रमावर छापे घालून अनेक महत्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत. त्यात कम्प्युटरची हार्ड डिस्क, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि वादग्रस्त कागदपत्रांचा समावेश आहे.

नित्यानंदांचा विश्वासू शिष्य बनायचे असेल तर तंत्रविद्येचा तपशील उघड करता येणार नाही, असे बंधन शिष्याला घातले जायचे. त्यासाठी करारपत्रावर सह्या घेतल्या जात असत. या विद्येतील तपशील उघड केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा मार्गही आश्रमाने राखून ठेवला होता. प्राचीन तांत्रिक गुह्यसुत्रे शिकण्याच्या अभ्यासक्रमाला 'महागुरूकडून शिकवणी' असे नाव होते. या कोर्ससाठी सहभाग नोंदविणार्‍यांत बहुतांश महिला असत आणि त्यातल्या ९० टक्के तमिळनाडूतील होत्या.

सीआयडीला काही सीडी सापडल्या आहेत. त्यात ३५ व्हिडीओ क्लिपिंग्ज आहेत. यात किमान पाच महिलांसोबत नित्यानंदाचे 'चाळे' चाललेले दिसत आहेत.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "नित्यानंदाच्या आश्रमात लैंगिक लीलांचा कोर्स!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner