...असा घडला विमानाचा अपघात

Posted on Saturday, May 22, 2010 by maaybhumi desk

एअर इंडियाचे एक्सप्रेस आयएक्स ८१२ हे विमान लॅंड होण्याची जागा चुकल्याने हा अपघात झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कमांडर जॅड ग्लुसिका आणि सहपायलट एच. एस. अहलुवालिया यांनी दुबईहून हे विमान मंगळूरला आणले होते. बाजपे विमानतळावर जिथे विमानाला जमिनीला स्पर्श करायचा होता, (टचडाऊन झोन) त्यासंदर्भात त्यांनी जमिनीपासून आकाशात दहा मैल असतानाच हवाई नियंत्रण कक्षाला (एटिसी) सूचना दिली होती.


भारतीय विमानतळ नियंत्रण प्राधिकरणाच्या अधिकार्‍याने यासंदर्भात सांगितले, की हे विमान टचडाऊन झोनपासून चार किलोमीटर असतानाच एटीसीने पायलटला उतरण्यास हिरवा झेंडा दाखवला.

त्यावेळी हवाही शांत होती. दृश्यताही सहा किलोमीटरची होती. पाऊस नव्हता. कोणतीही अडचण नव्हती. पायटलनेही त्याचे संकेत दिले.

पण त्यानंतर गडबड झाली. हे बोईंग ७३४-८०० विमान धावपट्टी २४ च्या टचडाऊन झोनच्या बरेच पुढे जाऊन जमिनीला टेकले. त्यामुळे विमान धावपट्टीच्याही पुढे धावत गेले. ते थांबवता आले नाही. मग वाटेत आलेली भिंतही त्याने तोडली आणि त्यानंतर असलेल्या दरीत जाऊन कोसळले.

मंगळूर विमानतळाची धावपट्टी जवळपास अडीच हजार मीटरची म्हणजे आठ हजार फूट लांबीची आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news
current news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner