संप मिटवा, अन्यथा परिणामांना तयार रहा- राज
Posted on Tuesday, May 04, 2010 by maaybhumi desk
पगारवाढीच्या मागणीसाठी मोटरमन्सनी आंदोलन सुरू केले असले तरीही त्यामुळे लाखो मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही अडचण लक्षात घेऊन मोटरमन संघटनांनी त्वरित आंदोलन बंद न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना सायंकाळपासून मोटरमन विरोधात आंदोलनात उतरेल आणि मनसेचे आंदोलन कसे असते हे तुमही चांगलेच समजून आहात असा स्पष्ट इशारा राज ठाकरे यांनी मोटरमन्सला दिला आहे.
राज म्हणाले, की मोटरमनच्या मागण्या योग्य असल्या तरीही अशा प्रकारे मुंबईकरांना वेठीस धरणे योग्य नाही. सरकारने केलेले दुर्लक्ष आणि हलगर्जीपणा यामुळे हे आंदोलन झाले असा आरोप करत मुंबईकरांना होणारा त्रास ही सर्वस्वी सरकारची जबाबदारी असल्याचे राज यांनी म्हटले आहे. मोटरमन सायंकाळपर्यंत कामावर हजर न झाल्यास त्यांनी मनसे स्टाईल आंदोलनास तयार रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "संप मिटवा, अन्यथा परिणामांना तयार रहा- राज"
Post a Comment