कसाबला मदद लागल्‍यास करू: पाक

Posted on Thursday, May 06, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद

आतापर्यंत कसाब पाकिस्‍तानी नसल्‍याचे आणि पाक सरकारचा त्याच्‍याशी काहीही संबंध नसल्‍याचा दावा करणा-या पाकला अचानक कसाब प्रेमाचा उमाळा आला असून मुंबई हल्‍ल्‍यातील दहशतवादी अजमल आमीर कसाबला भारतीय न्‍यायालयाने दोषी ठरविल्‍यानंतर जर त्‍याने मदत मागितली तर त्यावर आपण विचार करू, असे प्रतिपादन पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी केले आहे.

मलिक यांनी याबाबत पत्रकारांना सांगितले, की कसाबला दोषी ठरविल्‍यानंतर आणि त्याला शिक्षा सुनावली
गेल्‍यानंतरच याबाबत सरकार अधिकृत प्रतिक्रीया देईल. मात्र जर त्याने सरकारकडे मदतीची याचना केली तर त्याला मदत करण्‍याबाबत निश्चितच विचार केला जाईल.

कसाब भारताविरुद्ध युद्ध करण्‍यासह 86 आरोपांमध्‍ये दोषी आढळला असून त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाण्‍याची शक्यता आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कसाबला मदद लागल्‍यास करू: पाक"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner