प्रेम
Posted on Wednesday, August 24, 2011 by maaybhumi desk
गेले सहा दिवस तो सतत तिथं यायचा शिकारीला निघाला की ते हरण त्याला तिथंच उभं असलेलं दिसायचं. तो रोज त्या हरणावर लक्ष केंद्रीत करून नेम धरायचा आणि त्याच्या डोळ्यांतला करुण भाव पाहून त्याच्या हातातला धनुष्यबाण निखळायचा. हे असं का घडतयं या विचारानं त्याला अस्वस्थ केलं होतं.
त्यानं ठरवलं आणि त्या जंगलातल्या एका थोराड आदिवासी गृहस्थाला त्यानं विचारलं. त्याला सांगितलं की ते हरण रोज तिथं येत आणि तो त्याच्यावर नेम धरूनही बाण चालवू का शकत नाही.
तो वृध्द म्हणाला, खरं सांगू हे हरीण रोज आम्ही वाजत असलेला ढोल ऐकण्यासाठी इथं येतं. वा-याचा आवाज झाला तरीही घाबरून पळून जाणारे भित्रे हरीण ढोल ऐकायला येत हे काही त्याला पटलं नाही. त्यानं पुन्हा विचारलं. हे कसं शक्य आहे, हरणासारख्या भित्र्या प्राण्याने इतकं साहस करणं शक्यच नाही. त्याच्या डोळ्यात तो करूण भाव का असतो, की जो पाहताच शिका-याच्या हातातलं धनुष्यबाण खाली पडतो. त्याची गोंधळलेली अवस्था पाहताच तो वृध्द म्हणाला, ते हरीण इथं येतं आम्ही वाजवत असलेला ढोल पाहण्यासाठीच. त्याच्यातल्या त्या साहस आणि आणि डोळयातल्या कारुण्याचं कारण एकच आहे... या ढोलावरच कातडं आहे त्याच्या जीवनसाथीच....!
- संकलनः प्रिया कदम
(मायभूमीच्या एका वाचकाने पाठवलेले आणि थेट मनाला भिडणारे हे संकलीत लेखन खास 'मायभूमीकरांसाठी)
आपल्यालाही लिखाणाची आवड असेल तर आपले लिखाण आमच्याकडे पाठवा... आम्ही ते प्रसिद्ध करू....
वाचण्यासारखे आणखीही काहीः
write for us
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 203 weeks ago
Matrimony in Bangladesh