राम कदमांची 24 तास 'मनसे' सेवा
Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk
मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांच्या संपर्क कार्यालयाचे त्यांच्या मतदार संघात शुक्रवारी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. 24 तास उघड्या राहणा-या या कार्यालयाला दरवाजा नसून जनतेच्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी आपण तत्पर असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.
कदम यांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कार्यालयाला कुठलेही कुलूप किंवा दरवाजा बसविण्यात आलेला नसून जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी कदम यांनी वेगवेगळ्या विषयांची जबाबदारी सांभाळणा-या 20 कर्मचा-यांची नियुक्त केली आहे. या कर्मचा-यांना स्वखर्चातून पगार देणार असल्याची माहिती यावेळी कदम यांनी दिली आहे. कार्यालयाच्या कामाची मार्गदर्शक तत्वे इथे ठळक अक्षरात लावण्यात आली असून लोकांना मोफत सेवा दिली जाणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "राम कदमांची 24 तास 'मनसे' सेवा"
Post a Comment