हैतीमध्‍ये पुन्‍हा भूकंप

Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk

पोर्ट-ओ-प्रिंस

हैतीमध्‍ये गेल्‍या आठवड्यात आलेल्‍या विनाशकारी भूकंपातून अजुनही लोक सावरू शकले नसताना येथे पुन्‍हा शुक्रवारी रात्री जोरदार भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपामुळे लोक भयभीत झाले असून बचावकार्यावरही त्याचा परिणाम होत आहे.

भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्‍टर स्‍केल इतकी असून त्याचे केंद्र हैतीची राजधानी पोर्ट-ओ-प्रिंसच्‍या वायव्‍येस होते. भूगर्भ सर्व्‍हेक्षण विभागाने या संदर्भात दिलेल्‍या माहितीनुसार 12 जानेवारी रोजी आलेल्‍या 7 रिश्‍टर स्‍केलच्‍या भूकंपामुळे लाखो लोक मारले गेले असून अनेक जण बेघर झाले आहेत. या भूकंपानंतर आणखी काही दिवस हे धक्के जाणवत राहणार असल्‍याची शक्यता जाणकारांनी वर्तविली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "हैतीमध्‍ये पुन्‍हा भूकंप"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner