आसाम: 26 पर्यंत रेल्वे सेवा स्थगित
Posted on Saturday, January 23, 2010 by maaybhumi desk
गुवाहाटी
आसामच्या चिरांग जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या ग्रेनेड स्फोटानंतर रेल्वेने आणखी हल्ल्यांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्या सर्व प्रवासी रेल्वे सेवा प्रजासत्ताक दिनापर्यंत स्थगित ठेवल्या आहेत.
पोलिसांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार गुवाहाटीपासून 180 किलोमीटर दूर असलेल्या चिरांगच्या गोइलिंग गावात एका बाजारजवळ ग्रेनेड स्फोट झाला होता.
मोटारसायकलीवरून आलेल्या दहशतवाद्यांनी लोकांच्या गर्दीच्या दिशेने हा ग्रेनेड हल्ला केला होता. मात्र त्यांचा निशाणा चुकल्याने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही.
पोलिसांनी या संदर्भात प्रतिबंधित संघटना नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँडला (एनडीएफबी) जबाबदार ठरविले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "आसाम: 26 पर्यंत रेल्वे सेवा स्थगित"
Post a Comment