भारतीय विमान अपहरणाची शक्यता- एमआय 5
लंडन
पाकिस्तानातील अल कायदा दहशतवादी भारतीय विमानाचे अपहरण करून लंडन शहरावर हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली असून या घटनेनंतर ब्रिटनसह भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा एमआय-5 ने गेल्या आठवड्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला असून पाकिस्तानी अल-कायदा दहशतवादी इंडियन एअरलाईन्स किंवा एअर इंडियाच्या मुंबई-दिल्ली विमानाचे अपहरण करून....ते लंडनला नेण्याची शक्यता आहे.
हरकल-ऊल-जिहाद-अल इस्लामी या संघटनेचा अमजद ख्वाजा या दहशतवाद्याला काही दिवसांपूर्वी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले असून त्याच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे.
त्यानंतर एमआय-5नेही अशाच प्रकारची माहिती दिल्याने सुरक्षा यंत्रणा जागृत झाल्या आहेत.
No Response to "भारतीय विमान अपहरणाची शक्यता- एमआय 5"
Post a Comment