कुंभमेळा: प्रशासनाची कसरत

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

- महेश पाण्डे
21 व्या शतकातील पहिला महाकुंभमेळ्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारने 500 कोटी रूपयांचा खर्च करण्याचा दावा केला आहे. नियोजन व सुरक्षा व्यवस्था चोख करण्‍यात आली आहे की, यापूर्वी कधीच करण्‍यात आलेली नव्हती. जर आपण इतिहासाची पाने उलटविली असता आपल्याला येथे जमलेल्या लाखो साधु, भाविकांमध्ये झालेल्या खूनी संघर्षामुळे कुंभमेळ्याचा रंग फिका झालेला दिसतो.


click hereगेल्या अर्धकुंभमेळ्यात पोलीस व व्यापारी यांच्यात संघर्ष झाला होता. त्यात एक तरूण ठार झाला होता. लाखोंच्या घरात जमलेल्या जनसागराला नियंत्रित ठेवणे हे  येथील सरकारपुढ्यात एक आव्हान असते.
महाकुंभमेळ्यासाठी येथील पोलीसांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत अडीच हजार पोलीस कर्मचारी व पीएससीचे दोन हजार जवानांना प्रशिक्षित करण्‍यात आले आहे. यांना बॉम्ब शोधून त्याला डिसमिस करण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महाकुंभासाठी ड्यूटी लावण्यात आलेल्या जवानांना हरिद्वार बोलवून ज्वालापूर, कनखल, भूपतवाला, भेल व सिडकुलचा परिसर ही दाखविण्यत येत आहे. यशिवाय आपापसात चांगला समन्वय साधता यावा म्हणून त्यांची पंडा, व्यापारी, नेता व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी भेट घालून द‍िली जात आहे.


सरकारी अधिसुचनेनुसार 1 जानेवारी ते 30 एप्रिलपर्यंत कुंभमेळ्याचा कालावधी निश्चित करण्‍यात आला आहे. 15 जानेवारीला अडीच हजार पोलीस कर्मचारी हरिद्वारला चोख बंदोबस्त ठेवतील. 15 फेब्रुवारीपर्यंत 3,750 व मार्चपर्यंत 5,000 जवान सिव्हिल वर्दीत तैनात राहतील. याशिवाय 4,000 पीएससी जवान, 60 कंपनी अर्द्धसैनिक बलसह सुमारे   20,000 पोलीस कर्मचारी कुंभमेळ्यात तैनात राहतील. याव्यतिरिक्त जल पोलीस, घोडेस्वार पोलीस, स्निफर डॉग्स स्क्वॉड, वायरलेस ऑपरेटर, अग्निशमन, बीएसएफ, आरएएफ, आरपीएफ आदी जवान व होमगार्ड तैनात ठेवण्यात येणार आहे.

देहरादून व ऋषिकेशहून येणार्‍या भाविकांच्या वाहनांसाठी सप्तसरोवर, रायवाला व मोतीचूरमध्ये वाहन तळ तयार करण्‍यात आले आहे. सर्व पार्किंग स्थळ हरिद्वारच्या मुख्य स्नान स्थळापासून साधारण सहा ते सात कि.मी. अंतरावर आहे. भाविकांसाठी 80 सिटी बसेस सुरू करण्‍यात आल्या आहेत. स्नान करण्‍यासाठी भाविकांना तीन ते चार कि.मी. पायी चालावे लागणार आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कुंभमेळा: प्रशासनाची कसरत"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner