शाही स्नान: मुख्य आकर्षण

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

महेश पांडे
15310011485917766 कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाही स्नान असतो. शाही स्नानासाठी लाखोंच्या संख्येने साधु, भाविक निघतात. दरम्यान विविध आखाड्यांचे आयोजन केले जाते. त्यात एकात्मतेचे दर्शन दिसून येते. त्यातून सात्विक भावनाही प्रगट होतांना दिसतात. वैष्णवी आखाडे अठरा आखाड्‍याचे प्रतिनिधित्व करीत असतात. वैष्णवी आखाड्‍यातील 'महंत्त' ही पदवी प्राप्त करण्‍यासाठी नवोदीत संन्यास्याला अनेक वर्षांची सेवा करावी लागत असते.

वैष्णव आखाड्याची फार प्राचीन परंपरा आहे. नवोदीत साधु संन्यास ग्रहण केल्यानंतर तीन वर्षाची अथक सेवा करतात. तेव्हा त्यांना 'मुरेटिया' ही पदवी मिळते. त्यानंतर संन्यासी 'टहलू' पदास पात्र होत असतो. असे 'टहलू' संन्यासी महंतांची सेवा करतात. अनेक वर्षांची सेवा झाल्यानंतर 'टहलू' यांना 'नागा' ही पदवी मिळत दिली जाते. 'नागा' हे पद सांभाळणार्‍या साधुंवर आखाड्‍या संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. 
आखाड्या संबंधित महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या सकुशल सांभळणार्‍या 'नागा' साधूला 'अतीत' ही पदवी म‍िळत असते. 'अतीत'नंतर पुजारी पदासाठी पात्र होत असते. 'पुजारी' झाल्यानंतर एखाद्या मंदिराची जबाबरादी यशस्वी पार पाडल्यानंतर पुढे जावून त्यांना 'महंत' ही पदवी प्राप्त होत असते.

शाही स्नान आटोपन आल्यानंतर साधु मंहत आखाड्याच्या माध्यमातून विविध कलाप्रकार प्रदर्शित करीत असता. ते पाहण्‍यासाठी भाविकांची गर्दी होत असते.

कुंभातील पहिला स्नान 14 जानेवारी रोजी मकरसंक्रांतला सुरू झाला असून 15 जानेवारीला मौनी अमावास्या, 20 जानेवारीला वसंत पंचमी, 30 जानेवारीला माघ पौर्णिमा, 12 फेब्रुवारीला महाशिवरात्र, 15 मार्चला सोमवती अमावास्या, 16 मार्चला गुढीपाडवा, 24 मार्चला श्री रामनवमी, 30 मार्चला चैत्र पौर्णिमा, 14 एप्रिल मेष संक्रांत व 28 एप्रिलला वैशाख अधिकमास पौर्णिमेला विशेष शाही स्नानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. त्यानंतर कुंभमेळ्याचा समारोप केला जातो.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शाही स्नान: मुख्य आकर्षण"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner