मानवतेचा संगम 'कुंभमेळा'
- संदीप पारोळेकर
भारतीय संस्कृतीत कुंभमेळ्याचे खूप महत्त्व आहे. पुरणानुसार हा एकमात्र मेळा, सण व उत्सव आहे की त्यात मानवतेचा संगम होत असतो. हिंदुबांधव एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करताना दिसतात. भारतीय संस्कृतीत ही परंपरा फार प्राचीन आहे. त्याचा उल्लेख आपल्याला पुराणात सापडतो. प्राचीन काळी ऋषीमुनी नदीकाठी एकत्र येऊन मोठे अध्यात्मिक कार्य करत असत तसेच एखाद्या रहस्यावर विचारविनीमय करत असत आणि आजही ही परंपरा कुंभमेळ्याच्या रूपाने सुरू आहे. संपूर्ण भारतातून लाखो भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी हजेरी लावत असतात.
कुंभमेळा आयोजनामागे वैज्ञानिक कारण असू शकते. कारण जेव्हा जेव्हा कुंभमेळ्याला सुरूवात होते. तेव्हा सूर्यामध्ये काही ना काही बदल होत असतो आणि त्याचा परिणाम पृथ्वीवर जाणवतो. प्रत्येक अकरा, बारा वर्षांच्या अंतराने सूर्यमध्ये परिवर्तन होत असते.
कुंभमेळा भारतातील सगळ्यात मोठा धार्मिक सोहळा आहे. भारतभरातून लोखो नागरिक कुंभमेळ्यात हजेरी लावतात व पवित्र गंगा नदीत स्नान करतात. इतक्या मोठ्या संख्येने हजयात्रेत मक्का येथे मुस्लीम बांधव एकत्र येत असतात. या दोन मोठ्या धार्मिक सोहळ्यात मानवतेचा संभम होत असतो.
प्रत्येक तीन वर्षांनंतर एक असे बारा वर्षांत चार वेगवेगळ्या तिर्थक्षेत्रावर चार कुंभमेळ्यांचे आयोचन होत असते. अर्धकुंभ मेळा प्रत्येक सहा वर्षांत हरिद्वार व प्रयाग येथे भरतो तर पूर्णकुंभ बारा-बारा वर्षांच्या अंतराने केवळ प्रयाग येथे भरत असतो. बारा पूर्ण कुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा 144 वर्षांनंतर हरिद्वार (इलाहाबाद) येथे भरत असतो.
कुंभमेळ्याची कथा-
'कुंभ' या शब्दाचा अर्थ म्हणजे 'कळस' होय. समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर निघाले होते. त्यावरून देव व दानव यांच्यात युध्द झाले होते. युध्दात अमृतकुंभातील चार थेंब जमीनीवर पडले. ज्या चार ठिकाणी हे अमृताचे थेंब पडले, तेथे प्रत्येक बारा वर्षांत एकदा कुंभमेळा भरतो. बारा वर्षात एकदा आयोजित करण्यात येणार्या कुंभमेळ्याला महाकुंभ मेळा असे म्हटले जाते.
कुंभमेळ्याचे आयोजन स्थान-
हिंदू धर्मग्रंथानुसार इंद्राचा मुलगा जयंतच्या कळसातून अमृताचे चार थेंब भारतात चार जगी पडले. पहिला हरिद्वारमधील गंगा नदीत, दुसरा उज्जैन येथील शिप्रा नदीत, तिसरा नाशिक येथील गोदावरी व चवथा प्रयाग येथील गंगा, यमुना व सरस्वती नद्याच्या संगमावर पडला होता. आज ही चार स्थळे तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द असून येथे कुंभमेळा भरतो. लाखो भाविके त्यात सहभागी होऊन पवित्र स्थान करतात.
ज्योतिष महत्त्व-
कुंभमेळा आणि नऊग्रह यांचा फार जवळचा संबंध आहे. जेव्हा अमृतकुंभातून अमृत पृथ्वीवर पडले होते, तेव्हा जी ग्रहाची स्थिती होती तशीच स्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा कुंभमेळ्याचे आयोजन केले जात असते. हा योग प्रत्येक बारा वर्षांनंतर येत असतो.
अमृताचे थेंब पृथ्वीवर पडल्याने तेव्हा सूर्य, चंद्र, गुरु व शनि या ग्रहांनी अमृतकुंभाच्या रक्षणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे ज्या वर्षी ज्या राशीत सूर्य, चंद्र व गुरू अथवा शनि यांचा संयोग होतो, त्या वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
2010 कुंभ स्नान पर्व-
14 जानेवारी 2010 मकरसंक्रांत
15 जानेवारी 2010 मौनी अमावस्या- सूर्यग्रहण स्नान
20 जानेवारी 2010 वसंत पंचमी
30 जानेवारी 2010 माघ पौर्णिमा
12 फेब्रुवारी 2010 महाशिवरात्री- शाही स्नान
15 मार्च 2010 सोमवती अमावस्या- शाही स्नान
16 मार्च 2010 गुढीपाडवा- स्नान
24 मार्च 2010 श्रीराम नवमी- स्नान
30 मार्च 2010 चैत्र पौर्णिमा (पर्व स्नान)
14 एप्रिल 2010 मेष संक्रांत- शाही स्नान- मुख्य स्नान पर्व
28 एप्रिल 2010 वैशाख अधिमास पौर्णिमा
महाकुंभमेळ्याचे महत्त्व-
तब्ब्ल 535 वर्षांनंतर ग्रहांचे उत्तम योग आल्याने हरिद्वार येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथे लोखांच्या संख्येने साधु, संत, महत्त व भाविक उपस्थित झाले आहेत. तीन महिन्यांपर्यंत भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करतील. या काळात गंगा नदीवर स्नान करून यथाशक्ती प्रमाणे दानधर्म केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते, मृत्यूचे भय नाहिसे होते व घरात सुख शांती नांदते.
No Response to "मानवतेचा संगम 'कुंभमेळा'"
Post a Comment