नारायण यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ
Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk
कोलकाता
माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम.के. नारायाणन यांनी रविवारी पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाची जबादारी सांभाळली असून राजभवनात एका साध्या समारंभात त्यांनी आपल्या पदाची शपथ घेतली.
कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एम.एस. शाह यांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांना शपथ दिली. यावेळी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासह त्यांच्या मंत्री मंडळातील सदस्य, विधानसभा
अध्यक्ष हासिम अब्दुल हलीम, विरोधी पक्ष नेते पार्थ चट्टोपाध्याय यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते व अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी बिहारचे राज्यपाल देवानंद कोनवार हे प.बंगालच्या राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळत होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "नारायण यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ"
Post a Comment