खळेकाका, दुभाषी आणि विखे-पाटलांना पद्मभूषण
आमीर खानला पद्मविभूषण
नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात येणा-या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून इब्राहीम अल्काजी आणि झोहरा सेगल यांना पद्मविभूषण तर आमीर खान, अभिनेत्री रेखा, बाळासाहेब विखे पाटील आणि श्रीनिवास खळेंना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. वीरेंद्र सहवाग, सायना नेहवाल यांनाही पद्मश्री पुरस्कारांनी गौरवण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्या जाणा-या या पद्म पुरस्कारांमध्ये 130 नावांचा समावेश असून त्यात 6 पद्मविभूषण, 43 पद्मभूषण आणि 81 पद्मश्री विजेत्यांचा समावेश आहे. विजेत्यांची नावे अशी- डॉ. वेंकटरामण, रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर डॉ. वाय. वी. रेड्डी, ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल, इब्राहिम अल्काजी, ओमयालपुरम शिवरामन आणि प्रतापचंद्र रेड्डी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मभूषणः अकबर पदमसी, पद्माकर दुभाषी, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रमाकांत मदनमोहन पांडा, बाळासाहेब विखे पाटील, कॅ. सी.पी. कृष्णन नायर, उस्ताद सुलतान खान, संगीतकार इलयाराजा, ए.आर.रहमान, मल्लिका साराभाई (नृत्य) आणि मि. परफेक्शनिस्ट आमीर खान यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मश्रीः रमाकांत आचरेकर, उल्हास कशाळकर, डॉ. विकास महात्मे, अरुंधती नाग, सैफ अली खान, वीरेंद्र सहवाग, सायना नेहवाल, कार्मल बेर्क्सन, प्रा. अरविंद कुमार, कार्मेल बर्क्सन, क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग, रसूल पोकट्टी, अभिनेता सैफ अली खान, अनु आगा, क्रांती शहा, नारायण कार्तिकेयन, बॉक्सर विजेंदर सिंग आदींचा समावेश आहे.

No Response to "खळेकाका, दुभाषी आणि विखे-पाटलांना पद्मभूषण"
Post a Comment