मागल्या-पुढल्या पिढीत संवाद गरजेचा
Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk
या सर्व बाबी यात जणू विलीन झाल्या आहेत. या सर्वांच्या वर जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व. भारतीयत्वाच्या पुढेच भारतीय राष्ट्रीयत्व येते. भारताच्या बाबतीत राष्ट्रीयत्व म्हणजेच भारतीयत्व आहे. भारतीय असण्यातच राष्ट्रीयत्वाशी बांधिलकी आली.भारतीय आहोत, म्हणजे राष्ट्रीयत्वही त्यात अद्याह्रत आहे. भारतीयत्व व राष्ट्रीयत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगभरात आपली ओळख भारतीय म्हणून आहे आणि राष्ट्रीयत्वाशी कटिबद्ध असण्यावर आमच्या भारतीयत्वाची हमी अवलंबून आहे. सध्या आपल्यासमोर भारतीय समजाच्या तीन पिढ्या आहेत. एक साठ वर्षांहून अधिक वयाची, दुसरी त्यापेक्षा कमी व चाळीसपेक्षा जास्त वयाची आणइ त्यानंतरची अगदी तरणी म्हणजे अठरा वर्षाच्या आसपासची पिढी. या तिन पिढ्या म्हणजे भारताच्या राष्ट्रीयत्वाचे तीन चमचमते पैलू आहेत.
साठ वर्षावरील पिढीने भारताच्या स्वातंत्र्याची पहाट पाहिली आहे. त्याचवेळी चाळीशीतल्या पिढीने स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे. पण देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागल्या पिढीला काय करावं लागलं याची जाण त्यांना आहे. अठरा वर्षाची नवी पिढी मात्र या दोन्हीपेक्षा वेगळी आहे. ही पिढी स्वतंत्र भारतात जन्माला आली आणि स्वतंत्ररित्या वाढली. स्वातंत्र्य कसे मिळाले ते यांना माहित नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा नेमका अर्थही त्यांना कळालेला नाही. भौतिक वस्तूंचे आकर्षण, बाजारपेठीय जीवनशैली व जागतिकीकरण यात अडकलेल्या या पिढीला भारतीय राष्ट्रीयत्वाविषयी काहीही माहिती नाही.
त्यामुळे या तिन्ही पिढ्यांत संवाद होणे जरूरीचे आहे. त्यासाठी त्यांना एका व्यासपीठावर आणणे जरूरीचे आहे. या संवादातून मागल्या पिढीतून पुढल्या पिढीत संवाद होऊ शकेल. भारतीय अस्मिता ज्यामुळे पुनःप्रस्थापित झाली ते स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचा अर्थ या पिढीला मागल्या पिढीकडून कळेल. भारतीय संस्कृती, सहिष्णूता, अहिंसक विचारधारा, भारतीय विद्वत्तेची परंपरा सांगणारे लेख या सगळ्याची जाणीव त्याना करून द्यायला हवा. तरच त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ नव्या पिढीला कळेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "मागल्या-पुढल्या पिढीत संवाद गरजेचा"
Post a Comment