बीडीआरच्या 53 जवानांना आरोप मान्य
Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk
ढाका
गेल्या वर्षी बांग्लादेशात झालेल्या बंडखोरीच्या घटनेतील सहभागी बांग्लादेश रायफलच्या 53 जवानांनी आपल्यावरील आरोप मान्य केले असून सरकारने त्यांना माफ करावे अशी मागणी केली आहे. या बंडखोरीत 74 जण मारले गेले होते.
बीडीआर न्यायालयात 19 व्या रायफल बटालियनचे कमांडर लेफ्टनंट कर्नल गाजी सलाहुद्दीन यांनी जवानांवर लावण्यात आलेले आरोप सांगितले. त्यानंतर 62 पैकी 53 जवानांनी आपल्यावरील आरोप स्वीकार केले आहेत. तर इतर नऊ जवानांनी आपण या प्रकरणी दोषी असल्याचा इन्कार केला असून आपण त्यात सहभागी नव्हतो असा पवित्रा घेतला आहे.
ढाकाच्या बीडीआर मुख्यालयात गेल्या वर्षी 25 व 26 फेब्रुवारी दरम्यान बंड झाले होते. या जवानांनी बांग्लादेश रायफलच्या 57 अधिका-यांनाही ठार केले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "बीडीआरच्या 53 जवानांना आरोप मान्य"
Post a Comment