रेल्वेत 400 कोटीचा वीमा घोटाळा उघड
Posted on Monday, January 25, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
रेल्वेत 400 कोटी रुपयांचा वीमा घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी रेल्वेच्या एका सीनियर अकाऊंटंटला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे कर्मचा-यांना एलआयसीच्या ग्रुप इंश्योरंस योजनेनुसार वीमा सुविधा दिली जाते.    
आरोपींनी प्रीमियमची रक्कम वीमा कंपनीकडे भरण्या ऐवजी स्वतःचीच वीमा योजना सुरू केली. एखादी घटना घडलीच तर दाव्यांवर आरोपींकडून वीमा कंपन्यांच्या नियमानुसार भरपाईही दिली जात असे. हे सुमारे दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
 
 

No Response to "रेल्वेत 400 कोटीचा वीमा घोटाळा उघड"
Post a Comment