अमेरिकनांना भारतात न जाण्याचा सल्ला
Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk
वॉशिंग्टन
भारतात पुन्हा मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असून देशात मोठा हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तविली आहे. तसेच आपल्या देशातील नागरिकांना सध्या भारतात न जाण्याचा सल्ला दिला आहे.अमेरिकन परराष्ट्र विभागाकडून या संदर्भात एका एडव्हाइजरीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे, की आगामी काही महिन्यांमध्ये भारतात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असून नागरीकांनी भारतात न जाणेच श्रेयस्कर ठरणार आहे.
तर भारतात वास्तव्यास असलेल्या अमेरीकन नागरिकांनी सावध रहावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "अमेरिकनांना भारतात न जाण्याचा सल्ला"
Post a Comment