भारत बाल वेश्‍या व्‍यवसायाचे केंद्र!

Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
देशभरात बाल वेश्या व्‍यवसायाचे जाळे वाढत चालले असून लहान मुलांना फसवून या व्‍यवसायात आणणा-यांवर सरकारने विशेष यंत्रणा उभारावी अशा सूचना सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिल्‍या आहेत.

‘बचपन बचाओ आंदोलन’ या स्वयंसेवी संस्‍थेकडून या संदर्भात दाखल करण्‍यात आलेल्‍या जनहीत याचिके संदर्भात  सुनावणी करताना न्‍या.दलवीर भंडारी आणि ए.के. पटनाईक म्हणाले
, की ‘देशात मोठ्या प्रमाणावर गरीबी आणि बेरोजगारीमुळे लहान मुलांना वेश्‍या व्‍यवसायात आणले जात असून यामुळे सांस्कृतिक मूल्यांचा -हास होत आहे. जगभरात या अपराधांच्‍या तुलनेत भारतात त्‍याची संख्या वेगाने वाढत असून ही चिंताजनक बाब आहे.

न्‍यायालयाने या संदर्भात सरकारला स्‍पष्‍ट शब्‍दात कारवाईचे निर्देश दिले असून अशा प्रकारचे रॅकेट चालवणा-यांवर भादंवि कलम 376 अंतर्गत गुन्‍हा दाखल करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. अशा प्रकारच्‍या कारवाया 10-12 लोकांवरही झाल्‍या तरीही हे रॅकेट पत्त्यांच्‍या बंगल्‍यासारखे कोसळेल असा विश्‍वास न्‍यायालयाने वर्तविला आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भारत बाल वेश्‍या व्‍यवसायाचे केंद्र!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner