मद्यधुंद तरुणीच्‍या स्‍पीडने घेतले दोन बळी

Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk

click hereमुंबई
मद्यधुंद अवस्‍थेत बेफाम वेगाने गाडी चालवत एका तथकथित उच्‍चभ्रु श्रीमंत कुटुबातील तरुणीने आठ जणांना गंभीर रित्या जखमी केले असून त्‍यापैकी दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

येथील मरीन ड्राइव्‍हवर ही घटना घडली असून या दारूच्‍या नशेत तर्र असलेल्‍या या तरुणीने एका पोलीस व्‍हॅन आणि दोन कारला जोरदार धडक दिली. या अपघातात एक उपनिरीक्षकासह दोन जण ठार झाले आहेत. तर सहा जण जखमी झाले आहेत.


या संदर्भात मिळालेल्‍या माहितीनुसार नुरिया युसूफ हवेलीवाला (वय 27) ही तरुणी मद्यधुंद अवस्‍थेत होंडा सीआरव्‍ही कारने अतिशय वेगाने घराकडे निघाली होती. तिला पोलिसांच्‍या ड्रंक एन ड्राइव्‍ह अभियानातील पोलिसांनी थांबवण्‍याचा प्रयत्न केला असता तिने घाईगर्दीत आपल्‍या वाहनाची गती अधिक तेज केली. या वेगात तिने मरीन ड्राइव्‍हवर उभ्‍या असलेल्‍या दोन वाहनांना जोरदार धडक दिली. त्‍यापैकी एक गाडी पोलिसांची होती. या अपघातात एका व्‍यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून एक पोलीस उपनिरीक्षकाचा उपचारा दरम्‍यान मृत्यू झाला आहे. नुरीया एका बहुराष्‍ट्रीय कंपनीत नोकरीस असल्‍याचे सुत्रांनी सांगितले.

या तरुणीस अटक करण्‍यात आली असून तिच्‍यावर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मद्यधुंद तरुणीच्‍या स्‍पीडने घेतले दोन बळी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner