..तर आयपीएल होऊ देणार नाही: शिवसेनाप्रमुख

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

मुंबई


आयपीएलमध्‍ये ऑस्ट्रेलियन खेळाडू सहभागी झाल्‍यास मुंबईत आयपीएल सामने खेळू देणार नाही, असा पवित्राशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे. ऑस्‍ट्रेलियात भारतीयांविरोधात हल्‍ले थांबण्‍याची चिन्‍हे दिसतनसून ऑस्‍ट्रेलियन सरकारही त्‍याबाबत गंभीर नाही. त्‍या निषेधार्थ पक्षाने हा निर्णय जाहीर केला आहे.

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी याबाबत पत्रकारांना सांगितले, की ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात वर्णद्वेशीहल्‍ले सुरूच तेथे रोजच भारतीयांवर हल्‍ले केले जात आहेत.
अशा परिस्थितीत आयपीएलने ऑस्ट्रेलियन खेळाडूंनासामने खेळण्‍यास परवानगी दिली तर ही लज्‍जास्‍पद बाब आहे. शिवसेना हे खपवून घेणार नाही. तसेच तरआयपीएलमध्‍ये ऑस्‍ट्रेलियन खेळाडूंना सहभागी करून घेतले तर मुंबईत आयपीएल सामने होऊ देणार नाही.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "..तर आयपीएल होऊ देणार नाही: शिवसेनाप्रमुख"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner