जाहिरातः पंतप्रधान कार्यालयाची क्षमायाचना
Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या जाहिरातीत पाकिस्तानी अधिका-याचा फोटो प्रसिध्द झाल्याबद्दल संबंधित मंत्रालयाने बचावात्मक भूमिका घेऊन दोषी डीएव्हीपीच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला असला तरीही या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने एका पत्राद्वारे जाहीर माफी मागितली आहे.
पंतप्रधानांच्या माध्यम सल्लागारांकडून या संदर्भात प्रसारित करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे, की पंतप्रधानमंत्री कार्यालयाने (पीएमओ) जाहीर माफी मागितली असून अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "जाहिरातः पंतप्रधान कार्यालयाची क्षमायाचना"
Post a Comment