दोषींवर कारवाई करणारः तीरथ

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्‍ली

जाहिरातीत चूक झाली आहे. मात्र ही चूक जाहिरात व दृश्‍यप्रचार महासंचलनालयाकडून (डीएव्‍हीपी) झाली असल्‍याचा आरोप केंद्रीय महिला व बालकल्‍याण मंत्री कृष्‍णा तीरथ यांनी केला आहे. या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

राष्‍ट्रीय बालिका दिनानिमित्त केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने प्रकाशित केलेल्‍या जाहिरातीत पाकिस्‍तानी वायुसेना अध्‍यक्षांचा फोटो प्रकाशित झाला आहे. याबाबत प्रसारमाध्‍यमांच्‍या टीकेचे लक्ष्‍य ठरलेल्‍या तीरथ यांनी आपल्‍या मंत्रालयाचा बचाव करताना या प्रकरणास डीएव्‍हीपी जबाबदार असल्‍याचे म्हटले आहे.
आज रविवार असल्‍याने या संदर्भात सोमवारी चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "दोषींवर कारवाई करणारः तीरथ"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner