जावई माझा नवसाचा
![]()
विज्ञान जिथे हात टेकतं तिथं श्रध्देचा प्रवास सुरू होतो. हाच धागा पकडून निर्माते प्रकाश सुर्वे यांनी निर्माण केलेला ' जावई माझा नवसाचा' हा चित्रपट १२ फेबु्रवारीपासून मुंबईत सर्वत्र प्रद्रर्शित होत आहे. भैरव फिल्मस् प्रस्तुत या चित्रपटात दक्षिण कोकणची काशी समजली जाणारी व प्रति तुळजापूर म्हणून मान्यता पावलेली सुप्रसिध्द आंगणेवाडीची भराडी देवी हिचे महात्म्य या चित्रपटात कथेच्या अनुषंगाने मांडण्यात आली आहे.
आतापर्यंत महाराष्ट्रातील बहूतेक देव - देवींवर चित्रपट निर्मिती क्षाली आहे. पण महाराष्ट्रातील आंगणेवाडीच्या श्री भराडी देवी या प्रसिध्द नवसाला पावणाया देवीवरचं महात्म्य असलेला हा पहिलाच चित्रपट असून निर्माते प्रकाश सुर्वे यांनी ही कसर भरून काढली आहे. ' अबोली' या चित्रपटासाठी राज्य पुरस्कार मिळालेले निशिकांत सदाफुले हे या चित्रपटाचे दिग्दर्शक व संगीतकार आहेत.
'जावई माझा नवसाचा' या चित्रपटाची कथा आहे एका खेळकर पण बौध्दीक वाढ खुंटलेल्या एकवीस बावीस वर्षाच्या तरूणीची. आपली मुलगी बरी व्हावी म्हणून तिचे आईवडील सर्व परीने उपचार करतात. पण त्याचा काही फायदा होत नाही. डॉक्टरी उपाय थकल्यावर ती बरी व्हावी म्हणून तीचे आईवडील श्री भराडी देवीला नवस करतात.
त्यानंतर तीच्या आयुष्यात जे उत्कंठावर्धक बदल घडतात ते या चित्रपटात पहायला मिळतील. स्त्री मनाचा ठाव घेणारी ही कथा एका सामाजिक विषयाला स्पर्श करणारी आहे. कोकणातील लोकजीवन व तेथील संस्कृतीचं दर्शन या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार असून लोकनृत्य आणि लावणी या पारंपारिक नृत्याचा यात समावेश आहे.
दरवर्च्ची लाखोंच्या संखयेने दर्शन घेणार्या व नवसाला पावणायार्या या जागृत देवीचं महात्म्य सांगणारा हा चित्रपट भाविकांसाठी एक पर्वणी ठरेल असा निर्माता - दिग्दर्शकाना विश्वास आहे.
कोकणच्या मातीत चित्रीत झालेला मालवणी बोलीतला हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाची कथा सिंधुदुर्ग येथे घडत असल्याने ७० टक्के शुटिंग निसर्ग सौंदर्याने नटलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी, मसुरे, कणकवलीतील रामगड, गोठणे, किर्लोस येथे करण्यात आले असून उर्वरीत चित्रीकरण मुंबईत करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे चित्रीत करण्यात आलेले दिलखेचक लावणीनृत्य प्रसिध्द नर्तिका गौरी जाधव हिच्यावर चित्रीत झाले आहे. खास करून स्त्री वर्गाला आकृष्ट करणारा भावनिक संघर्ष हे या चित्रपटाचं वैशिष्टय असून उत्तम कथानकाबरोबर मधूर संगीताची जोडही आहे. प्रसिध्द गीतकार प्रविण दवणे व फ. मु. शिंदे यांची चारही गीते श्रवणीय क्षाली असून विशेषत: भराडी देवीचे महात्म्य असलेले गाणे अप्रतीम झाले आहे. मोबाईलवरचं लावणीनृत्य प्रेक्षकांना नाचायला लावेल. या चित्रपटाची कथा आबा पेडणेकर यांची असून पटकथा व संवाद निशिकांत सदाफुले यांचे आहेत. याचे सुंदर छायाचित्रण राहुल जाधव, संकलन विजय खोचीकर, ध्वनी विलास राऊत व कला केशव ठाकुर यांची आहे.
महेश ठक्कर या चित्रपटाचे सहनिर्माते असून अशोक पावसकर कार्यकारी निर्माते आहेत. तेजस सुर्वे निर्मिती प्रमुख असून निर्मिती व्यवस्था बाबल नाईक, योगेंद्र देसाई व किशोर दळवी यांची आहे.
यात वैविध्यपूर्ण भुमिकांसाठी प्रसिध्द असलेली आजची आघाडीची नायिका तेजा देवकर एका आगळया वेगळया भुमिकेत असून सोबत संतोष जुवेकर, उषा नाईक, उदय सबनीस, अभिजीत चव्हाण, लवराज कांबळी, पुर्णिमा अहिरे, गितांजली कांबळी, इला भाटे, प्रसाद पंडीत व बालकलाकार तेजस चोणकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत.
No Response to "जावई माझा नवसाचा"
Post a Comment