पाकिस्तानी खेळाडूंना आमीरची सहानुभूती
नवी दिल्ली
आयपीएलमध्ये खड्यासारखे बाजूला काढलेल्या पाकिस्तानी खेळाडूंविषयी सहानुभूतीचा ज्वर आता चांगलाच पस
रू लागला आहे. क्रीडामंत्री एम.एस.गिल, कोलकता नाईट रायडर्सचा मालक शाहरूख खान यांच्यानंतर आता आमीर खानही या वादात उतरला आहे. आपला संघ असता तर आपण खेळाडूच्या राष्ट्रीयत्वाचा विचार न करता त्याला त्याच्या खेळाच्या आधारावर नक्कीच घेतले असते, असे म्हटले आहे.
देशोदेशींच्या सीमा मानवाने आखल्या आहेत. पण एखादा चांगला क्रिकेटपटू असेल तर मी त्याला नक्कीच माझ्या संघात घेतले असते. तो कोणत्या देशाचा आहे, याचा विचारही मी केला नसता, अशा शब्दांत आमीरने पाकिस्तानी खेळाडूंप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे.
क्रिकेटमुळे आपण सर्व एकत्र येतो. पण कधी कधी त्या कारणावरूनही भांडतो. आपले भांडण हा मला तरी मुर्खपणा वाटतो. शेवटी हा खेळ आहे आणि त्याचा आनंद लुटला पाहिजे, असे आमीर म्हणाला.
No Response to "पाकिस्तानी खेळाडूंना आमीरची सहानुभूती"
Post a Comment