गोदावरीचे नाभिस्थानः नांदेड
नांदेड हे हिं
दु, शिख आणि महानुभाव पंथीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण. शिखांच्या पवित्र तख्तांपैकी एक येथे आहे. नांदेड शहराला शिखांच्या पहिले गुरू नानक आणि दहाव्या गुरू गोविंद सिंग यांचा संदर्भ असल्यामुळे शिख बांधव नांदेडचा गुरुद्वारा विशेष मानतात.
हिंदु प्राचीन धर्मग्रंथात आलेल्या वर्णनानुसार पुर्वी हे ठिकाण पैठणप्रमाणेच पवित्र मानले जायचे आणि संस्कृतीची उपासना इथे मोठ्या प्रमाणावर केली जायची. याशिवाय हे ठिकाण गोदावरी नदीचे नाभिस्थान मानले जाते.
तर महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींचे इथे काही काळ वास्तव्य होते. पण आज नांदेडचा जागतिक लौकीक आहे तो सचखंड श्री . हजुर अवचलनगर या शिखांच्या गुरूता गद्दीमुळे.
हे नाव या ठिकाणाला प्रत्यक्ष गुरू गोविंदसिंग यांनी दिले आहे. अवचलनगर याचा अर्थ अविचल म्हणजे कशानेही विचलित न होणारे शहर असा होतो. गुरू गोविंद सिंगांनी १७०८ मध्ये इथे शिखसंगत भरवली होती. त्या ठिकाणी संगत साहेब गुरूद्वारमंदिर आहेत.

गुरू गोविंदसिंगांनी त्यांचा घोडा दिलबाग याच्यासह दिव्यलोकात प्रस्थान केले. त्याच ठिकाणी महाराजा रणजीतसिंग यांच्या आदेशानुसार १८३२ ते १८३७ मध्ये गुरूद्वारा बांधण्यात आला.
हा गुरूद्वारा दोन मजली आहे. याची वास्तुरचना अमृतसरच्या सुवर्णमंदिरासारखीच करण्यात आली आहे. या गुरुद्वाराच्या आतील भिंती ज्यांना `अंगिठा साहेब` असे म्हटले जाते. त्याना सोन्याच्या पत्रांनी मढवले आहे. या गुरुद्वाराच्या पहिल्या मजल्यावर गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथाचे अखंड वाचन सुरू असते. या गुरुद्वाराचा घुमट आणि कळस त्यांब्यावर सोन्याचा पत्रा मढवून केले आहेत.
गुरू गोविंदसिंगांच्या काही पवित्र वस्तु इथे जतन करून ठेवल्या आहेत. ज्यामध्ये ३५ बाण असलेला भाता, धनुष्य, लोखंडी ढाल, पाच सोन्याच्या तलवारींचा समावेश आहे. गोविंद सिंगांनी शिखांच्या लौकीक मानवी धर्मगुरुंची परंपरा खंडीत करून त्यानंतर अनुयायांना मार्गदर्शन करण्याची संपूर्ण जबाबदारी गुरू ग्रंथ साहेब या ग्रंथावर सोपविली आणि याचा शब्द गुरुस्थानी मानण्याची आज्ञा केली ती इथेच.
इथेच लंगरमध्ये दर्शनार्थींना प्रसाद देण्यात येतो. पोटभर खा पण एक कणही सांडू नका हा इथला देडक प्रत्येक दर्शनार्थी आवर्जून पाळतात. इथली स्वच्छता अगदी वाखाणण्याजोगी. या गुरुद्वारापरिसरात भक्तांसाठी ३०० खोल्यांचे विश्रामगृह आहे. या गादीचा त्रिशताब्दी सोहळा नुकताच संपन्न झाला. त्याप्रित्यर्थ पर्यटनाच्या दृष्टीने अनेक चांगले बदल घडवून आणण्यात आले आहेत.
No Response to "गोदावरीचे नाभिस्थानः नांदेड"
Post a Comment