सानियाचे लग्न का मोडले?

Posted on Saturday, January 30, 2010 by maaybhumi desk

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे लग्न का मोडले? हा विषय सध्या सर्वत्र चर्चेचा आहे. सानियाचे लग्न मोडण्यामागे महेश भूपतीशी तिचे असलेले प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. तसेच सानियाचा इंटरनेटवर फिरणारा सेक्सी एमएमएसही हे लग्न मोडण्यास कारणीभूत असल्याचे वृत्त माध्यमांनी दिली आहे.
मागील वर्षात जुलै महिन्यात सानियाचा साखरपुडा तिचा बालमित्र आणि हैदराबादेतील बेकरी व्यावसायिक सोहराब मिर्झाशी झाला होता. सोहराब आपला बालमित्र असून, आपले त्याच्याशी चांगले जुळेल असे मत सानियाने यानंतर व्यक्त केले होते. परंतु लग्नापूर्वीच आम्ही परस्परांस अनुरूप नाही याची जाणीव झाल्याचे सांगत हे लग्न मोडल्याचा वृत्तास सानियाने दुजोरा दिला. परंतु हे प्रकरण वेगळेच असल्याची चर्चा आहे.

इंटरनेटवर सानियाचा एक सेक्स क्लिप असून त्यात सानिया तिच्‍या प्रियकरासोबत प्रेम क्रीडा करताना दिसत आहेत. सानियाला या हॉट एमएमएसने खूप दु:खही झाले. तिने हे एमएमएस बनावट असल्याचे सांगितले होते. या बनावट क्लिपमुळे सानिया आणि सोहराब यांच्यातील नात्यांमध्ये दुरावा आल्याचे म्हटले जाते.

सनियाचे लग्न मोडण्यामागे महेश भूपतीशी असलेले प्रेमप्रकरणही कारणीभूत असल्याची चर्चा आहे. महेश भूपती आणि सानिया 52 आठवड्यातून 40 आठवडे टेनिस खेळण्याच्या माध्यमातून एकत्र राहतात. यामुळे या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाल्याचे म्हटले जाते. नुकतेच महेश भूपतीने त्याच्या पत्नीला घटस्फोटही दिला. यामुळे त्याचा आणि सानियाच्या प्रेमाची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाली.

सानियाचे नाव शाहिद कपूर, अक्षय कुमार, तेलगू कलावंत नवदीप या कलावंताबरोबरही जोडले गेले. टेनिसपटू मरात साफिन याच्याबरोबर सानियाच्या प्रेमाची चर्चा होती.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सानियाचे लग्न का मोडले?"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner