दहशतवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद
Posted on Friday, January 29, 2010 by maaybhumi desk
जम्मू
जम्मूच्या किश्तवाड भागातील जंगलात गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या सैन्य आणि दहशतवाद्यांमधील भीषण चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. तर काही दहशतवादी या भागातील एका भुयारात लपले असून सर्च ऑपरेशन बातमी लिहित असेपर्यंत सुरूच आहे. सैन्य दलाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार गुप्त सूचनेच्या आधारावर 11 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी 300 किलोमीटर दूर अंतरावरील तक्षम भागातील सोंदार जंगलांमध्ये तपासणी अभियान सुरू केले आहे.
या अभियाना दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारी सुरू करून ग्रेनेड फेल्याने दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू झाला असून त्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर तीन दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "दहशतवाद्यांशी चकमकीत दोन जवान शहीद"
Post a Comment