उर्मिला ठरली सारेगमप महागायिका
Posted on Sunday, January 31, 2010 by maaybhumi desk
गेल्या अनेक दिवसांपासून अवघ्या मराठी संगीत रसिकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेल्या आयडीया सारेगमपच्या महाअंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला असून मुलींच्या विजयाची परंपरा कायम ठेवत मराठ मोळी गायिका उर्मिला धनगर हीने विजेते पद पटकाविले आहे. तर राहुल सक्सेना आणि अभिलाषा चेल्लम हे उपविजेते ठरले आहेत.
अंधेरीतील राजे शहाजी क्रीडा संकुलात रविवारी सायंकाळी पार पडलेल्या देखण्या संगीत सोहळ्यात रसिकांनी स्पर्धेतील तिनही गायकांना भरभरून दाद दिली. उर्मिला, राहुल आणि अभिलाषा यांच्यापैकी कोण विजेते ठरणार याबाबत मोठी उत्सुकता होती. रसिकांच्या 'एसएमएस'चा कौल उर्मिलाच्या पारड्यात पडला असून ती विजेती ठरल्याची घोषणा ज्येष्ठ शाहीर विठ्ठल उमप यांनी केली. यावेळी आयडीयाचे सीओओ शंकर रमण यांच्यासह संपूर्ण स्पर्धेत परिक्षक म्हणून भूमिका निभावलेले युवा संगीतकार डॉ.सलील कुलकर्णी आणि अवधुत गुप्ते हे देखिल उपस्थित होते.
आज महाअंतिम फेरी असल्याने या कार्यक्रमास सचिन पिळगावकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, सुधीर फडके, सुनील बर्वे यांच्यासह संगीत आणि चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलावंतांची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "उर्मिला ठरली सारेगमप महागायिका"
Post a Comment