रॉजर फेडररचा १६ वा ग्रँडस्लॅम विजय
Posted on Monday, February 01, 2010 by maaybhumi desk
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे रॉजर फेडररचाच झेंडा फडकला. ब्रिटनच्या अँडी मरेचा ६-३, ६-४, ७-६ (१३ / ११) असा पराभव करत फेडररने आपल्या कारकिर्दीतील १६ व्या ग्रँडस्लॅमवर आपले नाव कोरले.
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉजर फेडरर फेव्हरिट असल्याचे बोलले जात होते. अग्रमानांकित फेडरर आणि जागतिक रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या मरे यांच्यातील मॅच अडीच तास रंगली. फेडररने पहिलाच सेट ६-३ असा आरामात खिशात घातला. त्यानंतर दुस-या सेटमध्येही त्याने ६-४ अशी बाजी मारली. तिस-या सेटमध्ये मात्र मरेने चांगला मुकाबला करत फेडररला खेळवले. टाय ब्रेकरवर अखेर ११-१३ अशा फरकाने फेडररने सेट जिंकला आणि १६ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.
फेडररच्या या झंझावातामुळे ग्रँडस्लॅम जिंकण्याचे ब्रिटीश टेनिस रसिकांचे स्वप्न पुन्हा एकदा धुळीला मिळाले. मरेच्या रूपाने ती संधी चालून आली होती. मात्र मरेने अगदीच निराशा केली. १९३६ साली फ्रेड पॅरी यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर कुणाही ब्रिटीश खेळाडूला ग्रँडस्लॅम जिंकता आलेले नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "रॉजर फेडररचा १६ वा ग्रँडस्लॅम विजय"
Post a Comment