न्यायदानात उशीर अराजकता पसरवतोः चौधरी
Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
कुठलाही सभ्य समाज कायद्याचे राज्य असल्याशिवाय आपले अस्तित्व टीकवून ठेवत नसून न्यायदानात होत असलेल्या अक्षम्य उशीरामुळे अराजकता जन्माला येत असल्याचे मत पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश इफ्तिखार मोहम्मद चौधरी यांनी शनिवारी व्यक्त केले.
वकीलांच्या नामांकना संदर्भात आयोजित एका कार्यक्रमात चौधरी म्हणाले, की वकील घटनेचे संरक्षणकर्ते असून न्यायदानात होणारी चूक अराजकता निर्माण करू शकते. उशीरा न्याय मिळणे हे न्याय नाकारण्यासारखे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वकिलांनी खोट्या केसेस न लढता समाजात न्यायाच्या संरक्षणासाठी काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "न्यायदानात उशीर अराजकता पसरवतोः चौधरी"
Post a Comment