सरकारी जाहिरातीत पाकिस्तानी फोटो!
नवी दिल्ली
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या एका जाहिरातीत भारतीय एअरचीफ मार्शल पी.व्ही.नाईक यांच्या जागी पाकिस्तानचे माजी वायुसेनाध्यक्ष तनवीर अहमद यांचा फोटो छापण्यात आला आहे. या चुकी संदर्भात सरकारने अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिले नसले तरीही भारतीय वायुसेनेही या संदर्भात सरकारकडे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त कन्या भ्रुण हत्येसंदर्भात जनजागृतीच्या उद्देशाने महिला व बालकल्याण मंत्रालयाने देशभरातील प्रसिध्द व्यक्तीच्या फोटोंचा वापर करून एक जाहिरात प्रसिध्द केली आहे.
या जाहिरातीत पंतप्रधान मनमोहन सिंह, सोनिया गांधी, कपिल देव, वीरेंद्र सहेवाग, सरोद वादक उस्ताद अमजद अली खान आदींच्या फोटोचा वापर करून 'जर या व्यक्तींच्या आईला तिच्या जन्मापूर्वीच मारून टाकण्यात आले असते तर देशात अशी नररत्ने जन्माला आली असती का' असा प्रश्न विचारणारी एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
या जाहिरातीत भारतीय एअर चीफ मार्शल पी.व्ही.नाईक यांच्या जागी पाकिस्तानी माजी वायुसेनाध्यक्ष अहमद यांचा फोटो प्रकाशित झाला आहे.
No Response to "सरकारी जाहिरातीत पाकिस्तानी फोटो!"
Post a Comment