कृष्णा यांचे वक्तव्‍य ‘अपरिपक्व’: पाक

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद
भारतावर भविष्यात घडलेल्‍या कुठल्‍याही दहशतवादी हल्‍ल्‍यामुळे द्विपक्षीय संबंध बिघडू शकतात हे परराष्‍ट्र मंत्री एस.एम.कृष्‍णा यांचे वक्तव्‍य अपरिपक्वतेचे लक्षण असल्‍याचे मत पाकिस्तानने सर्व राजकीय शिष्‍टाचार बाजूला ठेवून व्‍यक्त केले आहे.

पाकिस्तानी परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल बासित यांनी कृष्णा यांच्‍या वक्तव्‍यावर प्रतिक्रिया देताना म्‍हटले आहे, की स्थानिक सहकार्या शिवाय मुंबईवर हल्‍ला शक्य नव्‍हता. कृष्‍णा यांनी ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारचे अपरिपक्व विधान करू नये.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कृष्णा यांचे वक्तव्‍य ‘अपरिपक्व’: पाक"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner