मुंबईचे डबेवाले राजपथावर!

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

नवी rajpathदिल्ली
प्रजासत्ताकदिनी मुबंईचे डबेवाल्यांचे संचलन राजधानीतील राजपथावर होणार आहे. आज त्यांनी या संचलनातील सरावात भाग घेतला. चाकरमान्यांपर्यंत वेळेवर कसा डबा पोहचवला जातो आणि त्यासाठी काय कसरत करावी लागते, याचे प्रात्यक्षिक या निमित्ताने दिल्लीकरांना दिसले.
प्रजासत्ताकदिनी राजपथावर आपल्या संस्कृतीची ओळख म्हणून महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील १४ डबेवाल्यांनी भाग घेतला आहे. या डबा संस्कृतीची दिनचर्या कशी असते या विषयीची माहिती राजपथावर हे डबेवाले सादर करणार आहेत.
या चित्ररथाची माहिती देतांना सांस्कृतिक विभागाचे सहायक संचालक मदनसिंह राजपूत म्हणाले, मुंबईचा डबा हा मुंबईच्या संस्कृतीचा एक भाग आहे. ऑफिसपर्यत डबा अचूकपणे पोहोचवणे ही या डबेवाल्यांची खासीयत मुंबईकरांच्या अंगवळणी पडली आहे. त्यातली अचूकता लोकांसमोर येण्यासाठी त्याचे प्रदर्शन संचलनानिमित्ताने दिल्लीकरांना घडेल. चित्ररथात सीएसटी रेल्वे स्टेशनही दाखविले आहे. यामध्ये १२ पुरूष व २ महिलांनी भाग घेतला  आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मुंबईचे डबेवाले राजपथावर!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner