दहशतवादी हल्‍ल्‍याची दाट शक्यताः एंटनी

Posted on Sunday, January 24, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
आगामी काही दिवसांत देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्‍ले होण्‍याची शक्यता असून या दरम्‍यान सीमेपलीकडून घुसखोरीच्‍या घटनांमध्‍येही वाढ झाली असल्‍याचा दावा संरक्षण मंत्री ए.के. एंटन यांनी केला आहे. असे असले तरीही त्याबाबत चिंता करण्‍याची गरज नसून भारतीय जवान अशा प्रकारच्‍या घटनांचा मुकाबला करण्‍यास पूर्णतः सक्षम असल्‍याचे त्‍यांनी म्हटले आहे.
ट्रांसपरन्‍सी इंटरनॅशनल द्वारा आयोजित एक कार्यक्रमात ते म्हणाले, की गेल्‍या दो महिन्‍यांत सीमेपलीकडून घुसखोरीच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली असून हा क्रम सुरूच राहण्‍याची शक्यता आहे. काश्मीरमधील स्थिती सुधारत चालली असल्‍याने दहशतवाद्यांना ते सहन होत नसल्‍याने ते हल्‍ल्‍याच्‍या तयारीत आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "दहशतवादी हल्‍ल्‍याची दाट शक्यताः एंटनी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner