चटवाल यांच्या 'पद्मभूषण'ला भाजपचा विरोध
न्यूयॉर्क
भारतीय वंशाचे अमेरिकन हॉटेल व्यवसायिक संत सिंह चटवाल यांना पद्मभूषण पुरस्कार दिला जाण्याबद्दल भाजपने नाराजी व्यक्त केली असून चटवाल यांच्यावर भारतीय स्ट्रेट बँकेच्या 90 लाख डॉलरचा भ्रष्टाचार असल्याचा आरोप असताना त्यांना हा पुरस्कार कुठल्या आधारावर हा पुरस्कार दिला गेला असा प्रश्न केला आहे.
दरम्यान, चटवाल यांनी आपल्या पुरस्कारावर भाजप राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. चटवाल यांना भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला असून यावर भाजपा कडक शब्दात आक्षेप घेतला आहे. चटवाल यांनी भारतीय स्टेट बँकेतून 90 लाख डॉलरचा हेरफेर केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. तर याबाबत सीबीआयने त्यांच्यावर आरोपपत्रही दाखल केले होते.
चटवाल यांच्या अशा रेकॉर्डनंतर त्यांना हा पुरस्कार कसा दिला गेला असा प्रश्न भाजपने उपस्थित केला असून याबाबत चटवाल यांनी आपण राजकीय पक्षांची चिंता करत नसल्याचे म्हटले असून भाजप केवळ विरोधाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, की यापूर्वी मला 'एलिस आइजलँड मेडल ऑफ ऑनर' हा अमेरिकन शासनाचा पुरस्कारही दिला गेला होता. हा पुरस्कार देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या गुन्हेगारी आणि वैयक्तीक कारकीर्दीची संपूर्ण चौकशी केली जात असते, असा दावा केला आहे.
No Response to "चटवाल यांच्या 'पद्मभूषण'ला भाजपचा विरोध"
Post a Comment