ऑस्‍ट्रेलियन हल्‍लेखोरांचे वय 18 वर्षापेक्षा कमी!

Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk

मेलबोर्न
गेल्‍या वर्षी मार्चपासून आतापर्यंत ऑस्‍ट्रेलियात भारतीयांवर झालेल्‍या हल्‍ल्‍यातील अर्ध्‍याहून अधिक आरोपी 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असल्‍याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

व्‍हीक्टोरिया पोलिसांचा हा अहवाल ऑस्ट्रेलियन परराष्‍ट्र मंत्री स्टीफन स्मिथ यांना सोपविला आहे. या अहवालात खुलासा करण्‍यात आला आहे, की मार्च 2009 पासून 5 जानेवारी 2010 दरम्‍यान भारतीयांवर हल्‍ल्‍या संदर्भात जितक्या लोकांना अटक करण्‍यात आली आहे त्‍यात अर्ध्‍याहून अधिक आरोपींचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. अहवालात असेही म्हटले आहे, की 18 पैकी दोन केसेसमध्‍ये घडलेली घटना हा एक अपघात होता. या प्रकरणांमध्‍ये आतापर्यंत 33 जणांना अटक करण्‍यात आली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "ऑस्‍ट्रेलियन हल्‍लेखोरांचे वय 18 वर्षापेक्षा कमी!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner