ब्रिटनची कबुली, भारत महासत्ता आहेच!
लंडन
भारत ही महासत्ता आहेच, अशी कबुली ब्रिटनने दिली आहे.
भारताच्या हीरक महोत्सवी प्रजाकसत्ताक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड मिलिबॅंड यांनी ही कबुली दिली. ते म्हणाले, माझ्या मते एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिले असता भारत ही निर्विवाद महासत्ता बनलेली आहे. भारताची ताकद, लोकशाही, बौद्धिक संपदा आणि व्यावसायिक वृद्धी यांचा विचार केल्यास भारत निर्विवाद महासत्ता आहेच.
भारताच्या शैक्षणिक वर्तुळातून दर वर्षी बाहेर पडणारे सहा लाख अभियंते आणि गेल्या वर्षी विषाणू संक्रमणासंदर्भात नोबेल पुरस्कार मिळविणारे शास्त्रज्ञ प्रा. वेंकटरमण रामकृष्णन यांची उदाहरणे त्यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ दिली.
मिलिबॅंड यांच्या या कौतुकाला उपस्थित भारतीयजनांनी जोरदार टाळ्यांची पावती दिली. यावेळी केंद्रीय मंत्री कमलनाथ, उद्योगपती मुकेश अंबानी, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉंटेकसिंह अहलुवालिया, पत्रकार बरखा दत्त आदी उपस्थित होते.
No Response to "ब्रिटनची कबुली, भारत महासत्ता आहेच!"
Post a Comment