...तर झरदारींवर कारवाई- गिलानी
Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk
इस्लामाबाद
पाकिस्तानी संसदेने आणि घटनेने राष्ट्राध्यक्षांना काही अधिकार दिले आहेत. जर संसदेने हे अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला तर झरदारींवर कारवाईसाठी पाक सरकार तयार असल्याचे मत पाकिस्तानचे पंतप्रधान युसुफ रजा गिलानी यांनी व्यक्त केले आहे.
घटनेने राष्ट्राध्यक्षांना काही बचावात्मक अधिकारी दिल्याने झरदारींवर तूर्तास कारवाई शक्य नसल्याचे ते म्हणाले. झरदारींवर पाकिस्तानात अनेक गुन्हा दाखल असून, ते 11 वर्षे तुरुंगातही होते.
देशाची राज्यघटना बदलण्याचा अधिकार केवळ संसदेला असून, इतर कोणीही राज्यघटना बदलात हस्तक्षेप करू शकत नसल्याचे गिलानींनी स्पष्ट केले आहे. घटनेत बदल करण्याचा निर्णय संसदेने घेतल्यास झरदारींवर कारवाई करण्यास आपण तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "...तर झरदारींवर कारवाई- गिलानी"
Post a Comment