आणखी चार भारतीयांवर ऑस्ट्रेलियात हल्ला
Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk
मेलबर्न
ऑस्ट्रेलियात भारतीयांवर होत असलेले हल्ले थांबायची चिन्हे दिसत नाहीत. आणखी चार भारतीयांवर ब्रिस्बेनमध्ये हल्ला झाल्याची बातमी स्काय न्यूजने दिली आहे. यात तीन जण टॅक्सीचालक होते. त्यातल्या एकाला टॅक्सीतून बाहेर काढून ठोसे लगावण्यात आले.
ऑस्ट्रेलियात सत्तर टक्के टॅक्सीचालक भारतीय आहेत. आणखी एका घटनेत पिझ्झा पोहोचविण्याची जबाबदारी असलेल्या एका भारतीय युवकाला क्रिकेटच्या बॅटने मारून लुटण्यातही आले.
ऑस्ट्रेलियात या महिन्याभरात भारतीयांवर झालेला दहावा हल्ला आहे. दरम्यान, ब्रिस्बेन येथील भारतीय दूतावासाचे अधिकारी एस. डी. सिंह यांनी सांगितले की या हल्ल्यासंदर्भात काल पोलिसांना माहिती देण्यात आली असून त्यांनी एकाला अटक केली आहे. या घटनेचा तपशील मिळालेला नसल्याचेही ते म्हणाले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "आणखी चार भारतीयांवर ऑस्ट्रेलियात हल्ला"
Post a Comment