शाहरूख खानला 'पाक' प्रेमाचा पुळका!
अहमदाबाद      
 आयपीएलच्या तिसर्या मालिकेसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात पाक खेळाडूंना वगळल्याने दुखावलेल्या कोलकाता नाईट राइडर्सचा मालक व बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खानला पाक प्रेमाचा पुळका आला आहे.
या खेळाडूंना आयपीएलने चांगली वागणूक दिली पाहिजे होती, असे त्याने एका खाजगी वाहिनीशी बोलताना सांगितले आहे.
माय नेम इज खान हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या पार्श्वभूमीवर शाहरूखला अचानक पाक प्रेमाचे भरते आल्याने अनेकांना त्याच्यात त्याच्या व्यावसायिक फायद्याची बाब डोकावताना दिसते आहे. पाकिस्तानचे 11 खेळाडू लिलावाच्या यादीत होते. मात्र आयपीएलच्या एकाही संघाने त्यांना घेतले नाही. त्यांना हीन वागणूक दिली. 
आपीएलने हे प्रकरण प्रेमाने हाताळायला हवे होते, असेही म्हणायला त्याने कमी केले नाही. 'पाक क्रिकेटपटू चॅम्पियन आहे, त्यांची निवड व्हायला हवी होती. संघातील विदेशी खेळाडूंचा कोटा पूर्ण झाला आहे, नाही तर पाक खेळाडूंची निवड केली असती', असे ही शाहरूखने पाक खेळाडूंचे गोडवे गायले.
कोलकाता संघाकडे केवळ एकच जागा खाली होती. त्यासाठी शेन बांडची निवड केली असल्याचे शाहरूखने सांगितले. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात आपल्या वडिलांचा जन्म झाला असल्याने त्या भूमीबद्दल प्रेम असल्याची भावना एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली होती.
No Response to "शाहरूख खानला 'पाक' प्रेमाचा पुळका!"
Post a Comment