भारताचा सलग पाच मालिका जिंकण्याचा विक्रम

Posted on Thursday, January 28, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
बांगलादेशविरुद्धची मालिका 2-0 अशी जिंकून भारताने सलग पाच कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताच्या कसोटी इतिहासात प्रथमच भारताने सलग पाच मालिका जिंकल्या आहेत.

बांगलादेश मालिकेपूर्वी डिसेंबर महिन्यात श्रीलंकेला 2-0 असे भारताने पराभूत केले होते. त्यापूर्वी न्यूझीलंड आणि इंग्लंडला 1-0 असे हरविले होते. सन 2008 मध्ये ऑस्ट्रेलियास 2-0 असे पराभूत केले होते. यामुळे सलग पाच ‍मालिका भारताने जिंकल्या आहेत. भारतीय संघ 435 कसोटी सामने खेळला असून त्यातील 103 सामने जिंकला आहे. 136 सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले असून एक सामना बरोबरीत सुटला आहे. 195 सामने अनिर्णीत राहिले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भारताचा सलग पाच मालिका जिंकण्याचा विक्रम"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner